Sameer Amunekar
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ८ जुलै (मंगळवार) ५३ वर्षांचा झाला आहे. सौरव गांगुलीच्या नावावर असे काही विक्रम आहेत जे आतापर्यंत मोडले गेले नाहीत. कोणते ते विक्रम जाणून घेऊया.
सौरव गांगुलीने १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषकात टॉन्टन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा केल्या. ही एकदिवसीय विश्वचषकात भारतीय फलंदाजाने खेळलेली सर्वात मोठी खेळी आहे.
सौरव गांगुलीने १९९७ मध्ये टोरंटो येथे पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय मालिकेत सलग चार 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकले आहेत.
२००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू कसोटी सामन्यात सौरव गांगुलीने २३९ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही डावखुऱ्या भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
१९९९ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची भागीदारी केली होती. विश्वचषकात भारताकडून कोणत्याही विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी आहे.
२००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गांगुलीने न्यूझीलंडविरुद्ध ११७ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हा अद्यापही कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सौरव गांगुलीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन शतके केली. या स्पर्धेत सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल, शिखर धवन आणि हर्शेल गिब्ससह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे.
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या जोडीने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. गांगुली-सचिन यांनी १७६ डावांमध्ये ४७.५५ च्या सरासरीने ८२२७ धावा केल्या.
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरची जोडी एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात यशस्वी सलामी जोडी होती. सचिन-गांगुलीच्या सलामी जोडीने १३६ एकदिवसीय डावांमध्ये ६६०९ धावा केल्या.