Sameer Panditrao
गायक सोनू निगम नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो.
हल्लीच एका कॉन्सर्टमध्ये त्याने पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यावरती केलेली कमेंट चर्चेत आहे.
सोनू निगम बंगलोरमध्ये कॉन्सर्ट करत होता. त्याची हिंदी गाण्यांची मैफिल रंगत आली होती.
इतक्यात एका चाहत्याने कन्नड गाणे म्हणण्याची मागणी केली.
या मुद्द्यावरून पुढे बराच गदारोळ झाला आणि कार्यक्रम थांबला.
यावरून सोनू भडकला आणि म्हणाला की अशा गोष्टींमुळे पहलगाम हल्ला झाला.
त्याला म्हणायचे होते की आपण प्रांत, भाषा यामध्ये विभागले आहोत, त्यामुळे इतरांचा सन्मान करत नाही त्यामुळे अतिरेकी याचा फायदा घेतात.