Sameer Amunekar
तुमच्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या मित्रांना तुमच्या प्रवासाची माहिती द्या. अज्ञात ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची जाणून घ्या. गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा आणि तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळा.
प्रवासाच्या ठिकाणांचा आधीच अभ्यास करा आणि अंदाजे बजेट तयार करा. हॉटेल किंवा होमस्टे बुकिंग आधीच करा, विशेषतः जर तुम्ही अपरिचित शहरात जात असाल तर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जाणून घ्या, त्यामुळे अधिक पैसे वाचतील आणि प्रवास सोपा होईल.
प्रवासात भेटलेल्या लोकांशी सौजन्याने वागा, पण जास्त विश्वास ठेवू नका.तुमच्या वैयक्तिक गोष्टी, बँकिंग माहिती किंवा प्रवासाच्या योजना अनोळखी लोकांसोबत शेअर करू नका.
गरजेचे सामानच बरोबर ठेवा, जड बॅग घेऊन फिरणे त्रासदायक ठरू शकते.पॉवर बँक, मल्टी पर्पज नाईफ, मेडिकल किट आणि बेसिक वस्त्रांची सोय असावी. डिजिटल आणि छापील (प्रिंटेड) दोन्ही प्रकारच्या ओळखपत्रांची प्रत बाळगा.
स्थानिक लोकांच्या प्रथांचा आदर करा आणि त्यांच्या नियमांचे पालन करा. नवीन खाद्यपदार्थ चाखा, पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
एकट्याने प्रवास करणे खूप रोमांचक आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरते. योग्य नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतल्यास हा प्रवास अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.