Sameer Amunekar
आयपीएल 2025 स्पर्धेत रोहितच्या मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 4 गडी राखून पराभव केला होता.
दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. मात्र, मुंबई इंडियन्सला हे आव्हान पार करता आलं नाही.
सामन्यादरम्यान, 15 वं षटक कर्णधार शुबमन गिल याने साई किशोरच्या हाती सोपलं. यावेळी साई किशोरसमोर हार्दिक पांड्या होता.
षटकाच्या चौथा चेंडूवर हार्दिकला फार काही करता येत नाही आणि बचावात्मक खेळतो. यावेळी चेंडू घेण्यासाठी साई किशोर जातो आणि रागात बघतो.
साई किशोर रागात बघतो तेव्हा हार्दिक पुढे येतो आणि जा असा सांगतो. पण साई किशोर पाहातच राहतो. मात्र, साई किशोरचं हे वागणं त्याला महागात पडलं आहे.
साई किशोर त्याच्या या वागण्यामुळं सोशल मिडियावर ट्रोल होत आहे.