गोमन्तक डिजिटल टीम
हिरवाईने नटलेला श्रावण म्हणजे निसर्गात फेरफटका मारण्यासाठी एक पर्वणीच. पाहू असेच एक ठिकाण जिथली शांतता तुम्हाला साद घालत आहे.
गोव्यामध्ये एक दिवसीय फेरफटका मारण्यासाठी जी ठिकाणे आहेत त्यातील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे सुकूर पठार होय.
पठारावर पोचल्यावर तुम्हाला दूरवर दिसणाऱ्या टेकड्या तुमच्या डोळ्यांसमोर एक सुखदायक लँडस्केप उभा करतात.
या ऋतूत पठारावर उमललेली विविध रंगांची रानफुले पठारावर जणू एक रंगीत शालू अंथरतात.
नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे संचार करणारी फुलपाखरे आणि पक्षी पाहताना वेगळाच आनंद मिळतो.
हिरव्यागार गवतात आणि धुक्याच्या दुलईत पठारावरील पायवाटा आपल्याला स्वर्गीय वाटू लागतात.
सूर्यास्ताच्या वेळी तुम्हे इथे असाल तर अनेक रंग उधळल्यासारखे चित्र पाहताना तुम्ही थक्क होऊन जाता.
खळाळता धबधबा आणि फेसाळणारा समुद्र एकत्र येणारे 'हे' जादुई ठिकाण..