Akshata Chhatre
यात दोन कपल्स किंवा मित्रांचे दोन गट एकत्र भेटतात. कॅफे, मूव्ही किंवा सहलीसाठी एकाच वेळी ४ लोक एकत्र गेल्याने वातावरण खेळीमेळीचे राहते.
आता तुम्ही तुमच्या ३ मित्रांची टीम बनवून 'ग्रुप कार्ड' तयार करू शकता. जेव्हा दुसऱ्या ग्रुपशी मॅच होते, तेव्हा सर्वजण ग्रुप चॅटमध्ये एकत्र बोलू शकतात.
एकट्यात भेटताना लोक स्वतःला चांगले दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ग्रुपमध्ये त्यांचा खरा स्वभाव, बोलण्याची पद्धत आणि इतरांशी वागणं लगेच समोर येतं.
सिंगल डेटवर 'काय बोलायचे?' हा ताण असतो. डबल डेटवर ४ लोक असल्याने संवादाचे विषय संपत नाहीत आणि 'ऑकवर्ड सायलेन्स'ची भीती राहत नाही.
मित्रांसोबत असल्याने आत्मविश्वास वाढतो. तुमचा जोडीदार तुमच्या मित्रांशी कसा वागतो, यावरून तुम्हाला नात्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळते.
तुमचे मित्र तुमच्या जोडीदाराबद्दल प्रामाणिक मत देऊ शकतात. ग्रुप सेटिंगमध्ये पार्टनरचा दिखाऊपणा किंवा राग ओळखणे सोपे जाते.
डबल डेटिंगमुळे केवळ जोडीदाराशीच नाही, तर मित्रांशीही नातं घट्ट होतं. हे डेटिंगला अधिक सामाजिक आणि मजेदार बनवण्याचं प्रभावी माध्यम आहे.