Manish Jadhav
उन्हाळ्यात आरोग्याबरोबर आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. आज (28 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून उन्हाळ्यात मनुका भिजवून खाण्याच्या फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले मनुके खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
भिजवलेल्या मनुक्यात मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
मनुक्यात लोह, तांबे आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. हे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात.
तसेच, मनुक्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर त्वचेला चमकदार बनवते.
उन्हाळ्यात भिजवलेले मनुके अधिक फायदेशीर मानले जातात. रात्रभर मनुके भिजवल्याने त्यांचा उष्ण स्वभाव कमी होतो, ज्यामुळे ते पचण्याजोगे होतात.