Sameer Amunekar
शेंगदाणे भिजवल्यामुळे त्यांची मूळची उष्ण प्रकृती कमी होते. उन्हाळ्यात हे शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होत नाही आणि दिवसभर काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा (Energy) मिळते.
उन्हाळ्यात अनेकदा पचनशक्ती मंदावते. शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने त्यातील फायबर सहज पचते. यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि पोट साफ राहते.
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण उत्तम असते. उन्हाळ्यात सकाळी हे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे अवेळी अरबट-चरबट खाणे टाळते आणि वजन नियंत्रणात राहते.
यामध्ये ओमेगा-६ फॅटी ॲसिड आणि निरोगी फॅट्स असतात. भिजवलेले शेंगदाणे नियमित खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून हृदयाचे रक्षण होते.
शेंगदाण्यांमध्ये 'व्हिटॅमिन ई' आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे होणारे त्वचेचे नुकसान टळते, चेहऱ्यावर चमक येते आणि केसांचे आरोग्यही सुधारते.
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये लोह (Iron) चांगल्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात थकवा किंवा चक्कर येण्याची समस्या असेल, तर रोज सकाळी हे खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.
जर तुम्ही उन्हाळ्यातही वर्कआउट किंवा व्यायाम करत असाल, तर भिजवलेले शेंगदाणे हा प्रोटीनचा एक स्वस्त आणि मस्त स्त्रोत आहे. हे खाल्ल्याने स्नायूंची झीज भरून निघते आणि शरीराला मजबूती मिळते.