Sameer Amunekar
त्वचा चमकदार दिसण्यासाठी ती हायड्रेट राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. कलिंगड, संत्री आणि लिंबू यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यातील 'व्हिटॅमिन सी' त्वचेचा कोलाजन (collagen) स्तर वाढवून नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो.
बदाम आणि अक्रोडमध्ये 'व्हिटॅमिन ई' आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते. हे घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात आणि वाढत्या वयाची चिन्हे म्हणजेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, लोह (Iron) आणि 'व्हिटॅमिन ए' भरपूर असते. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो.
टोमॅटोमध्ये 'लायकोपीन' (Lycopene) नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट असते. हे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून रक्षण करते आणि नॅचरल सनस्क्रीनसारखे काम करून टॅनिंग कमी करते.
पचनक्रिया चांगली असेल तर त्वचा आपोआपच स्वच्छ राहते. दह्यामध्ये असणारे 'प्रोबायोटिक्स' (Probiotics) पोट साफ ठेवतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या कमी होते आणि त्वचा मऊ राहते.
चहा किंवा कॉफीऐवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावा. यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स (झेंडे द्रव्ये) बाहेर टाकतात. यामुळे त्वचेची सूज कमी होते आणि चेहरा फ्रेश दिसतो.
गोड खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. यात असणारे 'फ्लॅव्होनॉइड्स' (Flavonoids) त्वचेचा पोत सुधारतात आणि त्वचेला हायड्रेट ठेवून एक सेलिब्रिटींसारखा ग्लो मिळवून देतात.