Sameer Amunekar
साप मेल्यानंतरही त्याच्या नसांमध्ये थोडावेळ हालचाल होऊ शकते. त्यामुळे डोके वेगळं केलं तरी काही वेळा चावण्याची प्रतिक्रिया दिसू शकते.
मेल्यानंतरही विष ग्रंथींमध्ये साठवलेले विष बराच वेळ ताजे राहते. त्यामुळे जर सापाच्या दातांनी कापलं, तर विष शरीरात जाऊ शकतं.
मृत्यू नंतर काही वेळ सापाच्या स्नायूंमध्ये व नसा प्रणालीमध्ये "रिफ्लेक्स मूव्हमेंट" होत राहते. त्यामुळे डोक्याचा किंवा तोंडाचा अचानक हलका झटका लागला तरी तो दंश करू शकतो.
विष ग्रंथीवर हलका दाब जरी आला तरी विष सापाच्या दातातून बाहेर येऊ शकतो.
सापाचे दात मृत्यूनंतरही तितकेच धारदार आणि घातक असतात. एखाद्या चुकून झालेल्या संपर्कामुळे ते त्वचेवर खोलवर जाऊ शकतात.
सापाचे विष मृत्यूनंतर तासन्तास किंवा काही वेळा दिवसांपर्यंतही सक्रिय राहू शकते. त्यामुळे मृत सापही धोकादायक असतो.
लोक मेल्यानंतर साप हातात घेतात किंवा खेळतात. अशावेळी चुकून दात टोचल्यास विष शरीरात जाऊ शकतं आणि अपघात होऊ शकतो.