Manish Jadhav
भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने इंग्लंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली.
नॉटिंगहॅम मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात स्मृतीने शानदार शतक झळकावले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरली होती. स्मृतीच्या 112 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावा केल्या.
पहिल्या सामन्यातच स्मृतीन इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने आपल्या अफलातून खेळीत 62 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि तीन षटकार मारले.
या शतकाच्या जोरावरच स्मृती तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.
जागतिक क्रिकेटवर नजर टाकल्यास स्मृती अशी कामगिरी करणारी केवळ पाचवी महिला खेळाडू आहे.
तसेच, इंग्लंडमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारी स्मृती दुसरी भारतीय महिला खेळाडू बनली. यापूर्वी, हरमनप्रीत कौरने अशी किमया साधली.