Manish Jadhav
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वन-डे मालिका शुक्रवारपासून (10 जानेवारी) सुरु झाली आहे.
मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृती मंधानाने छोटी खेळी खेळली पण नेहमीप्रमाणे ती प्रभावी ठरली.
नवखी सलामीवीर प्रतीका रावल संथ फलंदाजी करत असताना स्मृतीने संघाला जलद सुरुवात करुन दिली.
स्मृतीने आपल्या खेळीदरम्यान वन-डे क्रिकेटमध्ये एक नवीन टप्पा गाठला, जो आतापर्यंत भारतासाठी फक्त दोन महिला फलंदाजांना गाठता आला आहे.
स्मृती आता भारतासाठी वन-डे मध्ये चार हजारांहून अधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. तिच्या पुढे फक्त मिताली राज आहे, जिने सात हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
स्मृतीने आतापर्यंत 95 वन-डे सामन्यांमध्ये 4001 धावा केल्या आहेत. तिच्या आधी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी हरमनप्रीत कौरही स्मृतीपेक्षा खूपच मागे आहे.