Manish Jadhav
भारतीय महिला क्रिकेट संघाची धाकड सलामीवर फलंदाज स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावून स्मृती मानधनाने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विश्वविक्रम मोडला. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 4 वनडे शतके झळकावणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
भारतीय महिला संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृतीने 54 धावांची शानदार खेळी खेळली.
सलग दुसरे अर्धशतक झळकावून स्मृतीने महिला T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारी खेळाडू बनली.
3 सामन्यांच्या T20I मालिकेत सलग तिसऱ्यांदा 50+ धावा करुन स्मृतीने 9 दिवसांच्या आत तिसरा मोठा जागतिक विक्रम मोडला. स्मृती आता महिलांच्या T20I सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली.
T20I मध्ये सलग तीन अर्धशतके झळकावणारी मंधाना ही मिताली राजनंतरची दुसरी महिला भारतीय क्रिकेटपटू आहे.