Smart Gardening Tricks: कमतरता जागेची, हौस झाडांची? छोट्या बाल्कनीसाठी 'स्मार्ट' बागकाम ट्रिक्स!

गोमंतक ऑनलाईन टीम

व्हर्टिकल गार्डनिंगचा पर्याय निवडा!

भिंतीवर प्लांट स्टँड लावून कमी जागेत अनेक रोपे लावा आणि बाल्कनीला हिरवागार लुक द्या.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

हँगिंग प्लांटर्सने वाढवा शोभा!

छताला किंवा मजबूत हुकला टांगलेल्या कुंड्यांमध्ये मनी प्लांटसारखी वेलवर्गीय रोपे लावा.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

छोट्या कुंड्यांत फुलवा हिरवळ!

कोथिंबीर, पुदिना आणि मेथीसारख्या वनस्पती छोट्या जागेतही सहज वाढवता येतात.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

मल्टिलेव्हल प्लांट स्टँड वापरा!

एकावर एक अशा स्तरांमध्ये कुंड्या ठेवल्याने जागेचा योग्य वापर होतो आणि सर्व रोपांची मांडणी आकर्षक दिसते.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

सूर्यप्रकाशानुसार रोपे निवडा!

बाल्कनीत किती सूर्यप्रकाश येतो, हे पाहून रोपे लावा. यामुळे त्यांच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळते.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

सेल्फ-वॉटरिंग पॉट्स वापरा!

या कुंड्यांमुळे मातीतील ओलावा टिकवण्यास मदत होते. मात्र रोपांच्या गरजेनुसार पाणी आणि निचऱ्याची काळजी घ्या.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

कोपऱ्यांचा करा स्मार्ट वापर!

बाल्कनीच्या कोपऱ्यांत उभे स्टँड ठेवा आणि भिंतीलगत कुंड्या लावा. त्यामुळे चालण्यासाठी जागा मोकळी राहील आणि छोटी बाल्कनीही सुंदर दिसेल.

Smart Gardening Tricks | Dainik Gomantak

दिवाळीत दिसायचंय सर्वांत सुंदर? ट्राय करा 'या' ट्रेंडी ब्युटी लुक्स!

येथे क्लिक करा