Akshata Chhatre
तुम्ही तुमच्या घरच्या बाल्कनीत छोटंसं गार्डन सुरु करण्याच्या विचार करताय का? तर शहरातही निसर्ग अनुभवण्यासाठी बाल्कनी गार्डनिंग सर्वोत्तम पर्याय आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत.
झाडं लावण्यापूर्वी तुमच्या बाल्कनीची नीट ओळख पटली पाहिजे. तिथे सूर्यप्रकाश किती वेळ येतो? वाऱ्याचा जोर कसा आहे? याचा विचार झाडांची निवड करा.
मातीसाठी छिद्र असलेल्या कुंड्या वापरा. प्लास्टिक, सिरेमिक किंवा रीसायकल कंटेनर चालतील. रेलिंगसाठी हलक्या कुंड्या चांगल्या ठरतात.
बाल्कनीची सुरुवात करताना साधी झाडं लावून बघा. यामध्ये हर्ब्स जसे की पुदिना, तुळस, कोथिंबीर. फुलझाडांमध्ये झेंडू, गुलाब आणि भाजीपाल्यात टोमॅटो, मिरची, पालक यांचा समावेहस करता येतो.
बागेची माती + कंपोस्ट + कोकोपीटसहित असावी, ही मिक्स माती ओलावा टिकवते आणि पोषण देते.
या बागेला सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या मात्र माती कोरडी आहे का, तपासा जास्त पाणी देऊ नका.