Manish Jadhav
वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे मन शांत राहते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी पूर्वेकडे डोके करुन झोपणे फायदेशीर ठरते. या दिशेमुळे बुद्धी तल्लख राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
झोपताना डोके उत्तर दिशेला कधीही ठेवू नये. यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो, मानसिक अस्वस्थता वाढते आणि थकवा जाणवू शकतो.
जर दक्षिण किंवा पूर्व दिशा शक्य नसेल, तर पश्चिमेकडे डोके करुन झोपू शकता. ही दिशा मध्यम मानली जाते आणि पुरेशी विश्रांती मिळण्यास उपयुक्त ठरते
झोपण्याच्या खोलीत अनावश्यक पसारा, जास्त वस्तू किंवा गोंधळ ठेवू नका. स्वच्छ आणि शांत वातावरणामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर थांबवा. या साधनांमुळे झोपेच्या चक्रावर वाईट परिणाम होतो.
खोलीत खूप तेजस्वी दिवे टाळून सौम्य प्रकाश ठेवा आणि मऊ, स्वच्छ अंथरुणाचा वापर करा. यामुळे शरीर आणि मनाला पूर्ण आराम मिळतो.