Locker Vastu Tips: आर्थिक भरभराटीसाठी तिजोरी कोणत्या दिशेला असावी? जाणून घ्या वास्तुशास्त्र

Manish Jadhav

तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा

आर्थिक भरभराटीसाठी तिजोरी किंवा कपाट घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते, कारण या दिशा स्थिरता आणि संपत्ती टिकवण्यासाठी पोषक मानल्या जातात.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

तिजोरीचे तोंड कोणत्या दिशेला असावे

तिजोरीचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडेल अशा पद्धतीने ठेवावे; उत्तर ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने पैशांची आवक वाढण्यास मदत होते.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

स्वच्छ आणि सुरक्षित जागा

तिजोरी नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी; तिच्या आजूबाजूला धूळ, कचरा किंवा जुन्या निरुपयोगी वस्तू साठवून ठेवू नका.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

तिजोरीवर जड वस्तू टाळा

तिजोरीच्या वर किंवा तिच्या अगदी जवळ खूप जड वस्तू, लोखंडी सामान किंवा अडगळ ठेवणे टाळावे, जेणेकरुन आर्थिक प्रवाहात अडथळे येणार नाहीत.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

आरसा किंवा पाण्याचा स्रोत टाळा

तिजोरीच्या अगदी समोर आरसा लावू नये तसेच बाथरुम, सिंक किंवा पाण्याच्या टाकीच्या भिंतीला लागून तिजोरी ठेवणे टाळावे, कारण ते पैशांच्या व्ययाचे कारण ठरु शकते.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

तिजोरीत काय ठेवावे

तिजोरीत पैसे आणि दागिन्यांसोबत लाल कापडात गुंडाळलेली हळदीची गाठ, गोमती चक्र किंवा कुबेर यंत्र ठेवल्यास घरात सकारात्मकता आणि समृद्धी टिकून राहते असे मानले जाते.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

रिक्त तिजोरी ठेवू नका

तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नये; त्यात थोडीफार रक्कम, नाणी किंवा मौल्यवान वस्तू कायम राहील याची काळजी घ्यावी.

Locker Vastu Tips | Dainik Gomantak

Gardening Tips: मोगऱ्याची इम्युनिटी 'डाऊन' झालीय? पाण्यात थोडं ताक मिसळा आणि रोपाला द्या देसी 'एनर्जी बूस्टर'!

आणखी बघा