Akshata Chhatre
दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि सकाळी एकाच वेळी उठा. वीकेंडलाही हा नियम पाळल्याने शरीराचे 'स्लीप-वेक सायकल' मजबूत होते.
झोपण्यापूर्वी खोलीतील दिवे बंद करा आणि शांतता राखा. मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे झोपेच्या हार्मोनमध्ये अडथळा येतो.
रात्री खूप जास्त जेवण करू नका आणि उपाशी पोटीही झोपू नका. निकोटीन, कॅफीन आणि अल्कोहोलपासून लांब राहा, कारण यामुळे झोप वारंवार मोडते.
दिवसा जास्त वेळ झोपल्यास रात्री झोप येत नाही. दुपारची झोप घ्यायची असेल तर ती १ तासापेक्षा जास्त नसावी, याची काळजी घ्या.
नियमित व्यायाम केल्याने गाढ झोप लागण्यास मदत होते. मात्र, झोपण्याच्या अगदी जवळच्या वेळात जड व्यायाम करणे टाळावे.
कामाचा किंवा नात्यांचा ताण असेल तर झोपण्यापूर्वी मेडिटेशन किंवा जर्नलिंग करा. मनात साठलेल्या गोष्टी कागदावर उतरवल्याने मन हलके होते.
७ ते ९ तासांची दर्जेदार झोप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते. वरील सवयी आजपासूनच अंगीकारा आणि बदलाचा अनुभव घ्या!