लूक आणि टेक्नॉलॉजी 'लाजवाब'! स्कोडाची नवी सेडान Octavia RS भारतात धडकणार

Manish Jadhav

बहुप्रतिक्षित ऑक्टेविया आरएस

स्कोडा इंडियाची बहुप्रतिक्षित ऑक्टेविया आरएस लवकरच येत आहे. 6 ऑक्टोबरपासून बुकिंगला सुरुवात होणार असून, ही सेडान 17 ऑक्टोबरला लॉन्च होईल.

Octavia RS | Dainik Gomantak

दमदार इंजिन

या परफॉर्मन्स कारमध्ये 2.0-लीटर टीएसआय (TSI) पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे कारला प्रचंड वेग आणि शक्ती देते.

Octavia RS | Dainik Gomantak

उत्कृष्ट पॉवर आउटपुट

हे इंजिन तब्बल 216 hp पॉवर आणि 370 Nm चा टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे ती भारतीय रस्त्यांवरची सर्वात वेगवान सेडान ठरु शकते.

Octavia RS | Dainik Gomantak

टॉप स्पीड

ऑक्टेविया आरएस केवळ 6.4 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास इतका वेग पकडते आणि तिचा कमाल वेग 250 किमी/तास पर्यंत पोहोचू शकतो.

Octavia RS | Dainik Gomantak

स्पोर्टी डिझाइन

गाडीला एलईडी मॅट्रिक्स हेडलाईट्स, 18-इंच अलॉय व्हील्स मिळतील, तसेच तिचा स्पोर्टी लुक वाढवण्यासाठी ती नियमित मॉडेलपेक्षा 15 मिमी कमी उंचीवर (Lower ride height) असेल.

Octavia RS | Dainik Gomantak

इंटीरियर आणि फीचर्स

इंटिरियरमध्ये खास स्पोर्ट्स सीट्स, मोठे 13-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इतर प्रीमियम तंत्रज्ञान उपलब्ध असेल.

Octavia RS | Dainik Gomantak

खास एक्झॉस्ट सिस्टीम

या आरएस मॉडेलला तिच्या नॉर्मल व्हेरियंटपेक्षा वेगळे आणि अधिक दमदार आवाज देणारी खास एक्झॉस्ट सिस्टम (Exhaust System) जोडण्यात आली आहे.

Octavia RS | Dainik Gomantak

किंमत

सीबीयू (CBU) युनिट म्हणून येत असल्यामुळे याची किंमत जवळपास 50 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. बाजारात ती थेट फोक्सवॅगन गोल्फ जीटीआय (VW Golf GTI) शी स्पर्धा करेल.

Octavia RS | Dainik Gomantak

Tata Sierra: टाटा पुन्हा करणार धमाका; आयकॉनिक SUV नव्या अवतारात होणार लॉन्च!

आणखी बघा