Tata Sierra: टाटा पुन्हा करणार धमाका; आयकॉनिक SUV नव्या अवतारात होणार लॉन्च!

Manish Jadhav

टाटा सिएरा

90च्या दशकातील आयकॉनिक एसयूव्ही टाटा सिएरा नव्या डिझाइन आणि आधुनिक फीचर्ससह भारतीय बाजारपेठेत पुन्हा लाँच करण्यासाठी टाटा मोटर्स सज्ज आहे.

tata sierra | Dainik Gomantak

लॉन्चची प्राथमिकता

कंपनी 'सिएरा'चे इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) बाजारात सर्वात आधी लाँच करणार आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्स सादर केले जातील.

tata sierra | Dainik Gomantak

लॉन्च कधी?

ही एसयूव्ही BMGE 2025 इव्हेंटमध्ये दाखवली जाण्याची शक्यता असून, 2026 च्या सुरुवातीला ती भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.

tata sierra | Dainik Gomantak

आकर्षक डिझाइन

नवीन सिएरामध्ये स्लिम हेडलाईट्स, फुल-विड्थ एलईडी लाईट बार आणि ब्लॅक रूफसह पॅनोरमिक सनरुफ (Panoramic Sunroof) मिळेल, ज्यामुळे तिला 'फ्लोटिंग रुफ'चा आकर्षक लूक मिळेल.

tata sierra | Dainik Gomantak

EV ची ताकद

इलेक्ट्रिक सिएरामध्ये ड्युअल-मोटर सेटअपसह ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) क्षमता आणि 500 किमीपेक्षा जास्त रेंज मिळण्याची अपेक्षा आहे.

tata sierra | Dainik Gomantak

इंजिनचे शक्तिशाली पर्याय

पेट्रोलमध्ये नवा 1.5-लीटर टर्बो इंजिन (168 PS) आणि डिझेलमध्ये 2.0-लीटर इंजिन (170 PS) चे पर्याय उपलब्ध असतील.

tata sierra | Dainik Gomantak

आधुनिक इंटीरियर आणि तंत्रज्ञान

आतून ही एसयूव्ही पूर्णपणे मॉडर्न असेल. यात ट्रिपल-स्क्रीन सेटअप (तीन 12.3-इंच डिस्प्ले), लेव्हल-२ ADAS आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स असतील.

tata sierra | Dainik Gomantak

टेस्टिंग

ही एसयूव्ही डीलरशिप इव्हेंटमध्ये दाखवली गेली आहे आणि अनेकदा टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे, याचा अर्थ तिचा विकास जवळपास पूर्ण झाला असून, ती लाँचसाठी तयार आहे.

tata sierra | Dainik Gomantak

Mangalgad Fort: इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंगचा संगम; शिवकालीन 'मंगळगड' घालतो साद

आणखी बघा