Manish Jadhav
स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतीय बाजारात अखेर लाँच झाली आहे. याची एक्स-शोरुम किंमत 49.99 लाख रुपये आहे.
भारतासाठी या कारच्या केवळ 100 युनिट्स वाटप करण्यात आल्या होत्या आणि लॉन्च होण्यापूर्वीच त्या सर्व विकल्या गेल्या आहेत.
या परफॉर्मेंस सेडानची डिलिव्हरी 6 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. 'RS' बॅज ग्राहकांचे भावनिक नाते दर्शवतो, असे कंपनीने म्हटले आहे.
यामध्ये 2.0 लीटर TSI टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 265 BHP पॉवर आणि 370 Nm टॉर्क जनरेट करते.
ही सेडान केवळ 6.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी/तास वेग पकडते आणि तिचा कमाल वेग 250 किमी/तास आहे.
यात 19-इंच अलॉय व्हील्स, स्पोर्ट्स सस्पेंशन आणि प्रोग्रेसिव्ह स्टीयरिंग सेटअप मिळतो, ज्यामुळे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स सुधारते.
यात सेगमेंटमधील सर्वात मोठी 600 लीटरची बूट स्पेस आहे, जी मागील सीट फोल्ड केल्यावर 1555 लीटरपर्यंत वाढवता येते.
यात 10 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ADAS (Advance Driver Assistance Systems) आणि मसाज फंक्शनसह स्पोर्ट्स फ्रंट सीट्ससारखे फीचर्स मिळतात.