CNG Car: जबरदस्त मायलेज अन् क्लासिक लूक! लवकरच लॉन्च होणार परवडणारी CNG कार

Manish Jadhav

स्कोडा

भारतात खूप कमी वेळात लोकप्रिय झालेली स्कोडाची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलॅक लवकरच सीएनजी व्हर्जन लॉन्च करणार आहे.

skoda kylaq suv | Dainik Gomantak

कंपनीचा निर्णय

एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

skoda kylaq suv | Dainik Gomantak

भारतीय मार्केट

कायलॅक भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओ सारख्या सेगमेंटमध्ये विकली जाते.

skoda kylaq suv | Dainik Gomantak

पॉवरट्रेन पर्याय

पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायांव्यतिरिक्त या सेगमेंटमध्ये सीएनजी (CNG) हा आणखी एक चांगला पॉवरट्रेन पर्याय आहे. याशिवाय, क्लासिक लूक आणि जबरदस्त मायलेजसह ही सीएनजी कार लॉन्च होऊ शकते.

skoda kylaq suv | Dainik Gomantak

बाय-फ्यूल पॉवरट्रेन

कायलॅकची मागणी वाढवण्यासाठी स्कोडा या एसयूव्हीमध्ये पेट्रोल-सीएनजी बाय-फ्यूल पॉवरट्रेन सादर करण्याची योजना विचारात घेत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी आणखी वाढेल. तथापि, कंपनीने पॉवरट्रेनबद्दल काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही.

skoda kylaq suv | Dainik Gomantak

बुकिंग

स्कोडा कायलॅक पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली. तिची बुकिंग 2 डिसेंबर 2024 रोजी सुरु झाली असून तिची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होईल.

skoda kylaq suv | Dainik Gomantak
आणखी बघा