Sameer Amunekar
दोरीउड्या करताना शरीरातील मोठ्या प्रमाणात कॅलोरीज खर्च होतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
ही कार्डिओ एक्सरसाईज असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्ताभिसरण सुरळीत होते.
दररोज दोरीउड्या केल्याने शारीरिक क्षमता वाढते आणि थकवा लवकर येत नाही.
दोरीउड्यांमध्ये हात, पाय, पाठीचा कणा आणि पोट यांचा व्यायाम होतो, ज्यामुळे शरीर टोन होण्यास मदत होते.
दोरीउड्यांमुळे मेंदूमध्ये आनंददायक हार्मोन्स रिलीज होतात, जे तणाव कमी करतात.
सततच्या हालचालीमुळे हाडांची घनता वाढते आणि सांध्यांना मजबुती मिळते.
फक्त १५ मिनिटं आणि कुठेही करता येणारी ही एक्सरसाईज आहे, त्यामुळे वेळेचा अपव्यय होत नाही.