Akshata Chhatre
अनेक संशोधनांनुसार, रिकाम्या पोटी राहणे किंवा जेवणाच्या अनियमित वेळा मायग्रेन डोकेदुखीला 'ट्रिगर' करतात.
मायग्रेनमध्ये डोक्यात कोणीतरी वार करत असल्यासारख्या तीव्र वेदना होतात, ज्यामुळे तुमचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होते.
एकदा मायग्रेनचा अटॅक आला की, त्यानंतर २-३ दिवस थकवा आणि एकाग्रतेत कमतरता जाणवते, परिणामी कामावर परिणाम होतो.
जास्त स्क्रीन टाईम आणि वेळेवर न जेवल्यामुळे लहान मुलांमध्येही मायग्रेनची प्रवृत्ती वेगाने वाढत आहे.
ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी सकस आहार आणि नाश्ता करणे अनिवार्य करा.
वेळेवर जेवल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म चांगले राहते आणि मेंदूला सातत्याने ऊर्जा मिळाल्याने डोकेदुखीचा धोका कमी होतो.
जेवणाची वेळ निश्चित करणे हाच मायग्रेनवरचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.