Manish Jadhav
जसे आपण शरीराला आराम देण्यासाठी उपवास करतो, अगदी तसेच काही दिवसांसाठी चेहऱ्यावर कोणत्याही क्रीम्स किंवा केमिकल्सचा वापर पूर्णपणे थांबवणे म्हणजे 'स्किन फास्टिंग'.
आपल्या त्वचेमध्ये स्वतःला बरे करण्याची (Self-Healing) नैसर्गिक ताकद असते. जेव्हा आपण क्रीम्स लावणे थांबवतो, तेव्हा त्वचा स्वतःचे नैसर्गिक तेल तयार करुन स्वतःला आतून रिपेअर करते.
तासनतास निरनिराळे प्रॉडक्ट्स वापरल्याने चेहरा लाल पडणे, खाज सुटणे किंवा बारके पिंपल्स येणे सुरु होते. प्रॉडक्ट्स बंद करताच त्वचेची ही जळजळ लगेच शांत होते.
अनेकदा क्रीम लावल्याशिवाय चेहरा चांगलाच दिसत नाही अशी सवय त्वचेला लागते. स्किन फास्टिंगमुळे त्वचेचा केमिकल्सवरील आधार सुटतो आणि त्वचा नैसर्गिकरीत्या मजबूत बनते.
कठीण काहीच नाही! 2 ते 3 दिवसांसाठी सर्व सिरम्स, नाईट क्रीम्स आणि महागडे फेसवॉश बाजूला ठेवा. चेहरा धुण्यासाठी फक्त साधे पाणी किंवा अगदी सौम्य साबण वापरा.
बाहेरुन काहीही लावायचे नसल्यामुळे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. तसेच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
हा प्रयोग सलग 3 ते 5 दिवस करणे पुरेसे ठरते. 5 दिवसांनंतर त्वचा मूळ रुपात येते. त्यानंतर पुन्हा हळूहळू फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरसारख्या साध्या गोष्टी वापरण्यास सुरुवात करु शकता.