Sameer Amunekar
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहरा ताजातवाना दिसतो.
नियमित बर्फाचा वापर केल्याने डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात. थंडपणामुळे त्वचा घट्ट होते आणि सूज उतरते.
बर्फामुळे त्वचेवरील उघडी रोमछिद्रे आकुंचन पावतात. यामुळे धूळ आणि तेल आत जात नाही, आणि पिंपल्स होण्याची शक्यता कमी होते.
बर्फामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा मऊ, गुळगुळीत व स्वच्छ दिसते.
बर्फ त्वचेतील दाह कमी करतो. त्यामुळे पिंपल्सवरील लालसरपणा आणि सूज कमी होते, त्वचा शांत होते.
बर्फ हा नैसर्गिक टोनरप्रमाणे कार्य करतो. त्यामुळे केमिकल टोनर न वापरता त्वचेचा तजेला आणि घट्टपणा राखला जातो.
थंड बर्फामुळे चेहऱ्यावरील ताण कमी होतो, ताजेतवाने वाटते आणि झोपही शांत लागते.