Sameer Amunekar
संत्र्याची सालं उन्हात चांगली सुकवून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर तुम्ही डब्यात स्टोअर करू शकता.
एक चमचा संत्र्याच्या सालाची पावडर आणि दोन चमचे दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेचा टॅन दूर होऊन नैसर्गिक ग्लो येतो.
संत्र्याच्या सालामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते, जे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशन हलके करण्यास मदत करते.
या पावडरीमध्ये थोडे गुलाबपाणी आणि मध मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन सेल्स (मृत त्वचा) निघून जातात.
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर संत्र्याच्या सालाची पावडर आणि मुलतानी माती एकत्र करून लावा. हे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते.
या सालांमधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण व घट्ट (Tight) ठेवण्यास मदत करतात.
मध आणि संत्र्याची साल यांचे मिश्रण कोरड्या त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते, ज्यामुळे त्वचा मऊ, सुळसुळीत आणि चमकदार दिसते.