Monsoon Trip Destinations: पहिला पाऊस अन् निसर्गाचं सौंदर्य! जून महिन्यात फिरण्यासाठी 'ही' 7 ठिकाणं आहेत सर्वात बेस्ट

Sameer Amunekar

लोणावळा-खंडाळा

पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथील भुशी डॅम, राजमाची पॉईंट आणि धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडते.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

महाबळेश्वर-पाचगणी

जून महिन्यात येथील स्ट्रॉबेरीचे शेत आणि विल्सन पॉईंटवरून दिसणारा निसर्ग अधिकच खुलतो. हलका पाऊस आणि थंड हवामान मनाला ताजेतवाने करते.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

आंबोली

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आंबोली धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील हिरवेगार डोंगर आणि धुकं मनाला भुरळ पाडतात.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

भंडारदरा

निसर्गप्रेमींसाठी हे एक नंदनवन आहे. जून महिन्यात येथील 'काजवा महोत्सव' (Fireflies Festival) आणि विल्सन डॅमचा परिसर पाहण्यासारखा असतो.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

माथेरान

वाहनांना बंदी असलेले हे आशियातील एकमेव प्रदूषणमुक्त हिल स्टेशन आहे. पावसाच्या सुरुवातीला येथील टॉय ट्रेनचा प्रवास आणि डोंगरकपाऱ्यांमधील शांतता अनुभवण्यासारखी असते.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

चिखलदरा

विदर्भाचे काश्मीर मानले जाणारे चिखलदरा जून महिन्यात हिरवेगार होते. येथील कॉफीचे मळे, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य अप्रतिम दिसते.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

इगतपुरी

धबधबे, किल्ले आणि नयनरम्य घाटांसाठी इगतपुरी प्रसिद्ध आहे. पहिल्या पावसात येथील विपश्यना केंद्र आणि कसारा घाटाचे सौंदर्य दुप्पट होते.

Monsoon Trip Destinations | Dainik Gomantak

डे क्रीम आणि नाईट क्रीममध्ये नक्की फरक काय?

Skin Care Routine | Dainik Gomantak
येथे क्लिक करा