Sameer Amunekar
दिवसभर साचलेलं तेल, धूळ आणि मेकअप सौम्य ऑइल-फ्री फेसवॉशने स्वच्छ करा. यामुळे पोअर्स मोकळे राहतात.
गुलाब पाणी किंवा नीम/टी ट्री टोनर वापरा. यामुळे अतिरिक्त तेल नियंत्रणात येतं आणि पिंपल्स कमी होतात.
तेलकट त्वचेलाही मॉइश्चरची गरज असते. जेल-बेस्ड किंवा नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर योग्य ठरतो.
नायसिनामाइड किंवा सॅलिसिलिक अॅसिड असलेलं सीरम वापरल्यास त्वचा स्मूद होते आणि डाग कमी होतात.
हलकी आय क्रीम वापरल्यास काळी वर्तुळं आणि सूज कमी होण्यास मदत होते.
घाणेरडा फोन किंवा पिलो कव्हर पिंपल्सचं कारण ठरू शकतो. आठवड्यातून किमान दोनदा कव्हर बदला.
दररोज 7–8 तासांची झोप आणि पुरेसं पाणी घेतल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.