Sameer Amunekar
कोकणात फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. येथे काही प्रसिध्द थंडीत फिरण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स दिली आहेत.
नजरेच्या टप्प्यात न मावणारा स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा आणि अत्यंत रेखीव गणेश मंदिर यामुळे गणपतीपुळे एक विलक्षण अनुभव देते.
सोनेरी वाळू, घनदाट जंगले आणि इथून दिसणारा मनमोहक सूर्यास्त आरे–वारे बीचला खास बनवतो.
थंड हवामान, धबधबे आणि हिरवाईने नटलेले आंबोली हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.
१६व्या शतकात बांधलेला जयगड किल्ला स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. येथून अरबी समुद्रात शास्त्री नदीचा संगम दिसतो.
जयगड लाईट हाऊस परिसरातून गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर ३६० अंशांत पाहता येतो.
दोन टेकड्यांमध्ये वसलेला हा समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध असून गणपतीपुळे परिसरातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.