Sameer Amunekar
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. ताज्या लिंबाचा रस कापसाने डागांवर लावा, 10 मिनिटांनी धुवा.पण संवेदनशील त्वचेवर थेट लावू नये, थोडे पाणी/गुलाबपाणी मिसळून वापरा.
रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध अलोव्हेरा जेल डागांवर लावा. त्वचा थंड होते आणि नवे पेशी तयार होतात, त्यामुळे डाग हलके होतात.
हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदीला दूध किंवा दह्यात मिसळून पेस्ट तयार करून डागांवर 15 मिनिट लावा, नंतर धुवा.
बटाट्यात नैसर्गिक एन्झाईम असतात जे डाग कमी करतात. बटाट्याच्या फोडीने चेहऱ्यावर मसाज करा किंवा रस काढून डागांवर लावा.
मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत आणि दालचिनी त्वचेतील संसर्ग कमी करते. हे दोन्ही मिसळून फेसपॅकप्रमाणे आठवड्यातून 2 वेळा वापरा.
काकडीमध्ये थंडावा व नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. काकडीचा रस किंवा किस चेहऱ्यावर लावा, डाग आणि काळेपणा कमी होतो.
पुरेसे पाणी प्या, हिरव्या भाज्या, फळं, व्हिटॅमिन-C व व्हिटॅमिन-E युक्त पदार्थ खा. हे त्वचेची नैसर्गिक चमक वाढवतात आणि डाग कमी करतात.