Sameer Amunekar
तेलकट त्वचेसाठी सौम्य, सल्फेट-फ्री फेसवॉश वापरणे गरजेचे आहे. दिवसातून २ वेळा चेहरा धुवा.
गरम पाणी त्वचेचा नैसर्गिक तेल संतुलन नष्ट करते. कोमट पाण्याने चेहरा धुणे उत्तम.
दररोज स्क्रब केल्यास त्वचा कोरडी होते आणि तेल अधिक तयार होते. आठवड्यातून १–२ वेळा एक्सफोलिएशन पुरेसे.
तेलकट त्वचाही हायड्रेशनची गरज असते. हलका, ऑइल-फ्री मॉईश्चरायझर वापरा.
फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त साखर त्वचेला जास्त तेलकट बनवतात.
तेलकट त्वचेसाठी हलका, मॅट फिनिश सनस्क्रीन वापरा. सूर्याचे नुकसान कमी होते आणि त्वचा टवटवीत राहते.
त्वचेच्या आरोग्यासाठी पाणी, काकडी, कलिंगड, सफरचंद यांसारखी फळे आणि भाज्या फायदेशीर आहेत.