Face bleaching tips: चेहरा ग्लोइंग करण्यासाठी ब्लीच करताय? मग 'या' नियमांचं पालन करा, त्वचा राहील सुरक्षित

Sameer Amunekar

नियम पाळा, घाई टाळा

ब्लीचिंग कधीही दर आठवड्याला करू नये. महिन्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त ४० ते ४५ दिवसांतून एकदा करणे सुरक्षित मानले जाते.

Face bleaching tips | Dainik Gomantak

स्किन टाइप ओळखा

जर तुमची त्वचा 'ऑयली' (Oily) असेल, तर तुम्ही महिन्यातून एकदा ब्लीच करू शकता. परंतु, 'ड्राय' (Dry) त्वचेसाठी दीड-दोन महिन्यांचा अंतर ठेवणे उत्तम.

Face bleaching tips | Dainik Gomantak

पॅच टेस्ट अनिवार्य

ब्लीचिंग करण्यापूर्वी कानाच्या मागे किंवा मानेवर नेहमी पॅच टेस्ट करा. जर २४ तासांत खाज किंवा जळजळ झाली नाही, तरच चेहऱ्यावर वापरा.

Face bleaching tips | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा वापर

ब्लीच केल्यानंतर त्वचा अतिशय संवेदनशील होते. बाहेर पडताना किमान SPF 30 असलेल्या सनस्क्रीनचा वापर करणे अनिवार्य आहे, अन्यथा 'सन टॅन' लवकर होऊ शकते.

Face bleaching tips | Dainik Gomantak

अतिवापराचे धोके

वारंवार ब्लीचिंग केल्याने त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच कमी होते. यामुळे त्वचा अकाली वृद्ध दिसणे, कोरडेपणा आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Face bleaching tips | Dainik Gomantak

क्वालिटी आणि एक्सपायरी

नेहमी चांगल्या ब्रँडचे ब्लीच वापरा आणि वापरण्यापूर्वी त्याची 'एक्सपायरी डेट' तपासा. जुने किंवा खराब झालेले ब्लीच त्वचेची ॲलर्जी वाढवू शकते.

Face bleaching tips | Dainik Gomantak

नैसर्गिक पर्याय उत्तम

जर तुमची त्वचा अतिशय संवेदनशील असेल, तर ब्लीचिंगऐवजी बेसन, दही, टोमॅटो किंवा लिंबू-मध यांसारख्या नैसर्गिक घरगुती उपाय करणे केव्हाही अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते.

Face bleaching tips | Dainik Gomantak

बिअरमध्ये आहेत आरोग्यदायी गुणधर्म! जाणून घ्या बिअरचे फायदे आणि तोटे

Benefits and side effects of beer | Dainik Gomantak
येथे क्लिक करा