Skin Care Tips: 24 तास ग्लोईंग त्वचा हवीय? जाणून घ्या सकाळ आणि रात्रीची योग्य स्किनकेअर रूटीन

Sameer Amunekar

दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा

सकाळी उठल्याबरोबर किमान एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते, ज्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या नॅचरल ग्लोवर दिसून येतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सौम्य क्लिंजरचा वापर

सकाळी उठल्यावर त्वचा ताजीतवानी करण्यासाठी चेहऱ्याला चांगल्या व सौम्य (Mild) फेसवॉशने किंवा क्लिंजरने धुवा. रात्री जमा झालेली डेड स्किन आणि ऑइल स्वच्छ करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सीरम आणि हायड्रेशन

क्लिंजरनंतर त्वचेवर व्हिटॅमिन सी (Vitamin C) किंवा हायड्रोनिक ऍसिड सीरम लावा. हे सीरम चेहऱ्यावरील डाग कमी करून त्वचेला दिवसभर ओलसर आणि टवटवीत ठेवण्यास मदत करतात.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सनस्क्रीन कधीही विसरू नका

बाहेर पडण्यापूर्वी किंवा घरात असल्यावरही चांगल्या प्रतीचे एसपीएफ (SPF 30 किंवा अधिक) सनस्क्रीन लावा. हे सूर्यप्रकाशातील यूव्ही (UV) किरणांपासून त्वचेचं रक्षण करतं आणि टॅनिंग रोखतं.

Skin Care Tips | Dainik Gomantak

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील दिवसभराची धूळ, माती आणि मेकअप क्लॅन्सिंग बाम किंवा माईसेलर वॉटरने पूर्णपणे स्वच्छ करा. बंद झालेले रोमछिद्र (Pores) उघडे राहिल्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर

रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repair) करते. त्यामुळे झोपण्यापूर्वी त्वचेच्या प्रकारानुसार योग्य नाईट क्रीम किंवा हेवी मॉइश्चरायझर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करत लावा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप आणि पाणी

दिवसभरात कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या आणि रात्री ७ ते ८ तासांची गाढ झोप घ्या. पुरेशी झोप न झाल्यास डोळ्यांखाली का वर्तुळे (Dark Circles) येतात आणि ग्लो निघून जातो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मिरच्या लवकर सडतात? फक्त 5 मिनिटांत करा 'हे' काम

Green Chili Storage Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा