Sameer Amunekar
मिरच्यांमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे त्या फ्रिजमध्येही लवकर मऊ पडतात किंवा सडू लागतात. चुकीच्या पद्धतीने साठवण हे मुख्य कारण ठरते.
बाजारातून आणल्यानंतर मिरच्या धुवू नका. धुतल्यास त्यावरील ओलावा पूर्णपणे कापडाने किंवा टिश्यूने पुसून कोरड्या करा.
मिरच्यांचे देठ काढल्यास त्यातून ओलावा आणि हवा आत जाते, त्यामुळे त्या लवकर खराब होतात. साठवताना देठ तसेच ठेवा.
एअरटाइट डब्याच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवा. त्यावर मिरच्या ठेवून वर पुन्हा एक टिश्यू ठेवा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो.
मिरच्या प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता स्वच्छ, कोरड्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे त्या अधिक काळ ताज्या राहतात.
मिरच्या फ्रिजमधील व्हेजिटेबल क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा. वारंवार बाहेर काढणे आणि तापमानातील बदल टाळल्यास त्यांचे ताजेपण अधिक काळ टिकते.
योग्य प्रकारे साठवल्यास हिरव्या मिरच्या साधारण 2 ते 3 आठवडे ताज्या राहू शकतात. टिश्यू ओलसर झाल्यास तो बदलत राहा, त्यामुळे मिरच्या अधिक काळ फ्रेश राहण्यास मदत होते.