Skin Care Tips: महागड्या क्रीम्स विसरा! 'या' हिरव्या गोष्टींमुळे त्वचेला मिळेल नैसर्गिक चकाकी आणि चमक

Sameer Amunekar

कोरफड

त्वचेसाठी 'अमृता'सारखी असलेली कोरफड डाग आणि कोरडेपणा दूर करते. याचा ताजा जेल रोज चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

काकडी

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो, डार्क सर्कल कमी होतात आणि चेहरा टवटवीत दिसतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पुदिना

पुदिन्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते, जे पिंपल्स (मोहरी) येणे रोखते. पुदिन्याचा पॅक लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक फ्रेशनेस मिळतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कढीपत्ता

केसांसोबतच कढीपत्ता त्वचेसाठीही उत्तम आहे. कढीपत्त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यास मदत होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

हिरवा चहा

ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर त्वचेसाठीही डिटॉक्सचे काम करते. ग्रीन टी बॅग्स वापरून बनवलेला टोनर चेहऱ्यावरील सूज कमी करतो आणि त्वचा घट्ट (Tight) ठेवतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कोथिंबीर

कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. कोथिंबीरचा रस लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅनिंग दूर होऊन रंग उजळतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

लिंबू

व्हिटॅमिन 'सी'ने समृद्ध असलेले लिंबू नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते. लिंबाच्या रसाचा योग्य वापर (मधासोबत) केल्याने चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होऊन इन्स्टंट ग्लो मिळतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

दररोज 20 मिनिटांचं मेडिटेशन कसं बदलतं तुमचं आरोग्य?

Meditation Benefits | Dainik Gomantak
येथे क्लिक करा