Sameer Amunekar
दररोज फक्त २० मिनिटे डोळे बंद करून ध्यान केल्याने मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते. यामुळे मानसिक थकवा दूर होऊन मनाला प्रचंड शांतता लाभते.
मेडिटेशनमुळे शरीरातील 'कॉर्टिसॉल' (Cortisol) या स्ट्रेस हार्मोनची पातळी वेगाने कमी होते. परिणामी, अचानक येणारे टेन्शन आणि चिडचिड थांबते.
नकारात्मक विचार आणि नैराश्याची भावना कमी करण्यासाठी ध्यान हे उत्तम औषध आहे. हे तुमच्या मनातील सकारात्मकता वाढवून डिप्रेशनशी लढण्याची ताकद देते.
नियमित ध्यानामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते आणि स्मरणशक्ती (Memory) मजबूत होते.
टेन्शनमुळे अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. रोज २० मिनिटे मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि इन्सोमनिया (अपुऱ्या झोपेचा आजार) दूर होऊन गाढ झोप येते.
मेडिटेशनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे हाय ब्लड प्रेशरचा (High BP) त्रास कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.
ध्यान केल्याने आपल्याला स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवता येतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून येणारा राग किंवा नैराश्य कमी होऊन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो.