Sameer Amunekar
कोरफडीचा वापर
कोरफड त्वचेला नैसर्गिक थंडावा देते. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ताजी कोरफड जेल लावल्याने पिंपल्सची जळजळ कमी होते आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट पिंपल्सवर लावल्याने इन्फेक्शन पसरत नाही आणि पिंपल्स लवकर सुकण्यास मदत होते.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचा लाल होते. चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून लावल्याने चेहऱ्याला गारवा मिळतो आणि अतिरिक्त तेल (Oil) नियंत्रित राहते.
पिंपल्सवर सूज आली असेल, तर कापडात बर्फाचा तुकडा घेऊन हलक्या हाताने शेक द्या. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि पिंपल्सचा आकार लहान होतो.
पुदिन्याची पाने वाटून त्याचा रस पिंपल्सवर लावा. पुदिन्यातील सॅलिसिलिक ॲसिड पिंपल्स घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते आणि त्वचेला टवटवीतपणा देते.
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती हा उत्तम पर्याय आहे. ही माती चेहऱ्यावरील घाण आणि जास्तीचे तेल शोषून घेते, ज्यामुळे पिंपल्स येणे थांबते.
केवळ बाह्य उपाय पुरेसे नाहीत. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते आणि पिंपल्स कमी होतात.