Sameer Amunekar
वर्कआउट सुरू करण्यापूर्वी ५-१० मिनिटे वॉर्म-अप करणे आवश्यक आहे. यामुळे स्नायू लवचिक होतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो.
सुरुवातीला कोणतेही मशीन स्वतःहून वापरू नका. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास गंभीर दुखापत होऊ शकते, त्यामुळे ट्रेनरचे मार्गदर्शन नक्की घ्या.
पहिल्याच दिवशी जास्त वजन उचलण्याचा मोह टाळा. सुरुवातीला वजनापेक्षा व्यायामाच्या 'पोश्चर'वर (Posture) लक्ष केंद्रित करा.
व्यायाम करताना शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते. त्यामुळे मध्ये-मध्ये थोडे थोडे पाणी पित राहा, जेणेकरून ऊर्जा टिकून राहील.
नुसता व्यायाम करून उपयोग नाही. स्नायूंच्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी सकस, प्रोटीनयुक्त आहार घ्या. रिकाम्या पोटी जिम करणे टाळा.
व्यायामाइतकीच शरीराला विश्रांतीची गरज असते. रोज किमान ७-८ तास झोप घ्या, जेणेकरून तुमचे स्नायू रिकव्हर होतील.
रिझल्ट एका रात्रीत मिळत नाहीत. आठवड्यातून किमान ४-५ दिवस नियमित जिम करा. सुरुवातीचा उत्साह टिकवून ठेवणे हाच यशाचा मार्ग आहे.