Sameer Amunekar
अॅलोव्हेरामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी ताजं अॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावा. पिंपल्स शांत होतील आणि डाग कमी होतील.
हळद सूज कमी करते तर मध त्वचेला पोषण देतो. १ चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून आठवड्यातून २ वेळा फेसपॅक लावा.
नीम अँटीसेप्टिक आहे. नीम पानांची पेस्ट करून पिंपल्सवर लावा किंवा नीम पाण्याने चेहरा धुवा.
गुलाब पाणी त्वचेचे pH बॅलन्स ठेवते. रोज सकाळ-संध्याकाळ कॉटनने गुलाब पाणी लावा. त्वचा फ्रेश आणि क्लीन राहते.
टी ट्री ऑइल पिंपल्ससाठी प्रभावी उपाय आहे. १-२ थेंब टी ट्री ऑइल नारळ तेलात मिसळून पिंपल्सवर लावा.
शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे पिंपल्सची समस्या आतून कमी होते.
जास्त तेलकट, मसालेदार आणि फास्ट फूड पिंपल्स वाढवते. हिरव्या भाज्या, फळं आणि घरचं अन्न खा.