Sameer Amunekar
सकाळी उठल्यानंतर केमिकल फेसवॉशऐवजी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील घाण निघते आणि रक्ताभिसरण सुधारते.
चेहऱ्यावर हलकासा बर्फ फिरवा किंवा थंड पाण्याचे शिंतोडे मारा. यामुळे पोअर्स घट्ट होतात आणि त्वचेला ताजेतवाने लुक मिळतो.
गुलाबपाणी कापसाने लावा किंवा अॅलोवेरा जेल हलक्या हाताने मसाज करा. त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळून ग्लो वाढतो.
बोटांच्या टोकांनी वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे रक्तसंचार वाढतो, सूज कमी होते आणि चेहरा उजळ दिसतो.
सकाळी एक ग्लास कोमट पाणी किंवा लिंबूपाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचेवर आतून चमक येते.
घराबाहेर पडत असाल तर SPF असलेले सनस्क्रीन नक्की लावा. सूर्यकिरणांमुळे होणारे टॅनिंग व डाग टाळता येतात.
आरशात स्वतःकडे हसून पाहा. तणाव कमी ठेवल्यास त्वचेवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.