Skin Care Tips: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवीय? या Skin Care Routine ने मिळवा सुंदर त्वचा

Manish Jadhav

1.कोमट पाण्याने चेहरा धुवा

रात्री त्वचेवर साचलेली घाण, तेलकटपणा आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी कोमट पाण्याने चेहरा धुणे महत्त्वाचे आहे.

Skin Care Tips | Dainik Gomantak

2. फेसवॉश वापरा

रसायनमुक्त, आयुर्वेदिक किंवा होममेड फेसवॉश वापरा. बेसन, हळद, मध यांचा फेसवॉश म्हणून उपयोग केल्यास चेहऱ्यावर चमक येते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

3. दररोज मॉइश्चरायझर लावा

त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. अॅलोवेरा जेल, नारळाचे तेल, किंवा गुलाबजल मिसळून तयार केलेला घरगुती मॉइश्चरायझर तुम्ही वापरु शकता.

Skin Care Tips | Dainik Gomantak

4. सनस्क्रीन

UV किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी SPF असलेला सनस्क्रीन आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा काळवंडत नाही.

Skin Care Tips | Dainik Gomantak

5. आठवड्यातून दोनदा स्क्रब करा

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी घरगुती स्क्रब (उदा. साखर + मध किंवा ओट्स + दूध) वापरा. स्क्रबमुळे चेहरा फ्रेश आणि क्लिन वाटतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

6.पाणी प्या आणि फळे खा

त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी रोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. तसेच, पपई, सफरचंद, संत्री यांसारखी त्वचेसाठी फायदेशीर फळे आहारात घ्या.

Skin Care Tips | Dainik Gomantak

7. पुरेशी झोप

झोप कमी असल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचेवर थकवा जाणवतो. दिवसातून किमान 7-8 तास झोप आणि नियमित ध्यान-प्राणायाम केल्याने त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

Bhairavgad Fort: दुर्गम पण आकर्षक! दुर्गप्रेमींसाठी 'भैरवगड' रोमांचक ट्रेकिंग स्पॉट

आणखी बघा