Sameer Amunekar
कोरड्या त्वचेसाठी साबणमुक्त, क्रीम-बेस्ड फेसवॉश वापरा. दिवसातून फक्त 2 वेळा चेहरा धुवा.
चेहरा धुतल्यानंतर 1 मिनिटाच्या आत मॉइश्चरायझर लावल्यास ओलावा लॉक होतो आणि त्वचा मऊ राहते.
नारळ तेल, बदाम तेल किंवा अर्गन ऑइल रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज करा.
मध + दूध + ओट्स असा घरगुती फेस पॅक त्वचेला खोल पोषण देतो व नैसर्गिक ग्लो वाढवतो.
कोरड्या त्वचेसाठी SPF 30+ मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन रोज वापरा, अगदी घराबाहेर कमी गेलात तरीही.
दररोज किमान 8–10 ग्लास पाणी प्या. आहारात बदाम, अक्रोड, अवोकॅडो, तूप यांचा समावेश करा.
झोपण्यापूर्वी नाईट क्रीम किंवा अॅलोवेरा जेल लावा. पुरेशी झोप घेतल्यास त्वचा आपोआप चमकते.