Sameer Amunekar
चेहरा दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने धुवा. यामुळे धूळ, तेलकटपणा आणि मृत त्वचा निघून जाते व त्वचा स्वच्छ दिसू लागते.
बेसन + दही + चिमूटभर हळद असा स्क्रब वापरा. यामुळे खडबडीतपणा कमी होतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
त्वचा कोरडी असेल तर अॅलोव्हेरा जेल किंवा बदाम तेल वापरा. ओलसर त्वचेमुळे ‘ग्लास स्किन’ लूक मिळतो.
दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी प्या. शरीर आतून हायड्रेट राहिलं की त्वचा आपोआप मऊ आणि चमकदार दिसते.
दूध + मध मिसळून 10 मिनिटं चेहऱ्यावर लावा. हा उपाय त्वचेला पोषण देतो आणि खडबडीतपणा कमी करतो.
फळं, हिरव्या भाज्या, बदाम, अक्रोड यांचा आहारात समावेश करा. त्वचेसाठी आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.
दररोज किमान 7–8 तासांची झोप घ्या. झोप पूर्ण झाली की त्वचा फ्रेश, स्मूथ आणि नैसर्गिक चमकदार दिसते.