Sameer Amunekar
कोरियन स्किनकेअरमध्ये फेस मसाजला खूप महत्त्व आहे. दररोज चेहरा धुताना बोटांच्या साहाय्याने वर्तुळाकार मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताच्या नसा आकुंचन पावतात, सूज कमी होते आणि त्वचेची छिद्रे (Pores) बंद होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा घट्ट दिसते.
आंघोळ करताना किंवा गरम पाणी घेऊन त्याची वाफ चेहऱ्यावर घ्या. वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्यातील साचलेली घाण, तेल नैसर्गिकरित्या बाहेर पडते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते.
कोरियन सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ७-८ तासांची शांत झोप. झोपेत आपली त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repair) करते. पुरेशी झोप घेतल्यास डार्क सर्कल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर ताजेपणा दिसतो.
त्वचा बाहेरून चमकदार दिसण्यासाठी शरीर आतून हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या ग्लोवर होतो.
त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत म्हणून 'फेस योगा' करा. तोंडात हवा धरणे किंवा विशिष्ट हावभाव केल्याने चेहऱ्याचे स्नायू टोन्ड होतात आणि त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.
एका कपात कोमट पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ मिसळा. हे पाणी कापसाने चेहऱ्यावर लावल्याने त्वचा जंतूमुक्त होते आणि मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. हे एक उत्तम नैसर्गिक टोनर म्हणून काम करते.