Sameer Amunekar
विशीत त्वचा लवचिक असते, पण याच काळात भविष्यातील नुकसान टाळणे गरजेचे असते. रोज सनस्क्रीन लावणे हा या वयोगटातील सर्वात मोठा 'गोल्डन रूल' आहे.
तिशीनंतर त्वचेतील कोलाजेन कमी होऊ लागते. या वयात तजेला टिकवण्यासाठी व्हिटॅमिन C किंवा अँटी-ऑक्सिडंट सीरम वापरा. हे त्वचेला आतून पोषण देते आणि थकवा घालवते.
चाळीशीत त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे 'हॅलुरोनिक ॲसिड' किंवा रिच मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि त्वचा सैल पडत नाही.
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सर्वात पातळ असते. वयाची तिशी ओलांडल्यानंतर आय क्रीम (Eye Cream) वापरण्यास सुरुवात करा, जेणेकरून डार्क सर्कल्स आणि फाईन लाईन्स येणार नाहीत.
दिवसभराची धूळ आणि प्रदूषण साफ करून रात्री झोपण्यापूर्वी 'डबल क्लिंजिंग' करा. वयानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने नाईट क्रीम किंवा रेटिनॉलचा वापर केल्यास रात्री झोपेत त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते.
अनेकजण फक्त चेहऱ्याची काळजी घेतात, पण मान आणि हातांवर वयाच्या खुणा लवकर दिसतात. चेहऱ्याला लावलेले प्रत्येक उत्पादन (सनस्क्रीन, मॉइश्चरायझर) मान आणि हातांनाही नक्की लावा.
कोणतीही क्रीम बाहेरून काम करते, पण खरी चमक आतून येते. दिवसाला किमान ३-४ लिटर पाणी आणि आहारात ओमेगा-३ व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.