Konkan Tourism: धुक्यात हरवलेलं कोकण! 'या' ठिकाणी उन्हाळ्यातही मिळतोय 'एसी'सारखा थंडावा, एकदा नक्की भेट द्या

Sameer Amunekar

निसर्गाची किमया!

रणरणत्या उन्हाळ्यात जिथे महाराष्ट्र होरपळतोय, तिथे कोकणातील आंबोली मात्र धुक्याच्या चादरीत हरवलेलं पाहायला मिळतंय. इथलं थंडगार हवामान मनाला वेगळीच शांतता देतं.

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

उन्हाळ्यातही 'एसी'सारखा थंडावा

समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या या घाटात उन्हाळ्यातही तापमान अत्यंत कमी असते. येथील गारवा तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनची आठवण करून देईल.

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

धुक्यात हरवलेला घाट

आंबोली घाटातील नागमोडी वळणे आणि दऱ्यांमधून वाहणारे पांढरेशुभ्र धुके हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. इथे उन्हाळ्यातही पावसाळ्याचा भास होतो.

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

मुख्य आकर्षण

आंबोली धबधबा जरी पावसाळ्यात हा धबधबा रौद्ररुप धारण करत असला, तरी उन्हाळ्यात येथील संथ वाहणारे पाणी आणि आजूबाजूची हिरवळ पर्यटकांना सुखावून जाते.

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

कावळेसाद पॉईंट

येथील 'कावळेसाद' पॉईंटवरून दिसणारी विस्तीर्ण दरी आणि ढगांची दाटी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. फोटोग्राफीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

हिरण्यकेशी मंदिर आणि परिसर

निसर्गासोबतच अध्यात्माची जोड हवी असेल, तर हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी असलेल्या प्राचीन शिवालयाला नक्की भेट द्या. येथील कुंड आणि गुंफा खूप शांत आहेत

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

आजच प्लॅन करा 'वीकेंड ट्रिप'!

जर तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत कमी गर्दीच्या आणि शांत ठिकाणी जायचे असेल, तर आंबोली हा उत्तम पर्याय आहे. इथलं 'मिनी महाबळेश्वर' तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडेल!

Amboli Ghat Summer Tourism | Dainik Gomantak

कडक उन्हात व्यायाम करताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Summer Exercise Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा