Skin Care Tips: सुरकुत्यांची चिंता आता मिटली! 'हे' घरगुती उपाय वापरून पुन्हा मिळवा 10 वर्षांपूर्वीचा ग्लो

Sameer Amunekar

कोरफड

कोरफडमध्ये 'मॅलिक ॲसिड' असते, जे त्वचेचा लवचिकपणा वाढवण्यास मदत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा आणि सकाळी धुवा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे त्वचेच्या पेशींना हायड्रेट करते. रात्री झोपताना बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने चेहऱ्याला नारळाच्या तेलाने मसाज करा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

मध आणि लिंबाचा रस

मध त्वचेला ओलावा देते, तर लिंबातील व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. अर्धा चमचा मध आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

केळ्याचा मास्क

केळ्यामध्ये नैसर्गिक तेल आणि जीवनसत्त्वे असतात, जी सुरकुत्यांवर मात करण्यासाठी उत्तम आहेत. पिकलेले केळे मॅश करून त्याचा लेप चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

बदाम तेल

बदाम तेल त्वचेला पोषण देते. दररोज रात्री डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या असलेल्या जागी बदामाच्या तेलाने मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारते आणि त्वचा तरुण दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

दही आणि बेसन

दही त्वचेला एक्सफोलिएट करते आणि बेसन त्वचेला घट्ट करण्यास मदत करते. दही आणि बेसनाची पेस्ट करून चेहऱ्याला लावा. सुकल्यावर हलक्या हाताने मसाज करत धुवा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

पाणी आणि सकस आहार

तुमची त्वचा आतून हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. तसेच, आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई युक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

Skin Care Tips | Dainik Gomantak

महाराष्ट्र-गोवा सीमेवरचं 'सीक्रेट' डेस्टिनेशन!

Hidden Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा