Hidden Beach: महाराष्ट्र-गोवा सीमेवरचं 'सीक्रेट' डेस्टिनेशन! तुम्ही पाहिला का 'हा' निसर्गरम्य बीच?

Sameer Amunekar

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील सुंदर बीच

रेडी बीच हा महाराष्ट्र आणि गोवा सीमेच्या अगदी जवळ असल्यामुळे दोन्ही राज्यांतील पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

स्वच्छ पाणी आणि पांढरी वाळू

या समुद्रकिनाऱ्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे स्वच्छ, निळसर पाणी आणि लांब पसरलेली पांढरी शुभ्र वाळू.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

शांत आणि गर्दीपासून दूर

गोव्याच्या गजबजलेल्या बीचच्या तुलनेत रेडी बीच खूप शांत आहे. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट मानले जाते.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

प्रसिद्ध रेडी गणपती मंदिर

रेडी गावात असलेले रेडी गणपती मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे असलेली गणपतीची मूर्ती खूप मोठी आणि आकर्षक असून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

सुंदर सूर्यास्ताचा नजारा

संध्याकाळी या बीचवर दिसणारा सूर्यास्त मन मोहून टाकणारा असतो. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण खास आहे.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

निसर्गरम्य वातावरण

नारळाची झाडे, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण यामुळे येथे आल्यावर निसर्गाच्या कुशीत आल्याचा अनुभव मिळतो.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

कुटुंबासोबत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण

वीकेंड ट्रिप, फॅमिली पिकनिक किंवा शांत सुट्टीसाठी रेडी बीच हे सिंधुदुर्गातील एक उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते.

Redi Beach Maharashtra Goa border | Dainik Gomantak

कोकणातल्या या 'अनएक्सप्लोर्ड' किनाऱ्याचं सौंदर्य पाहून व्हाल थक्क

Hidden Nivati Beach Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा