वाचताना लक्ष लागत नाही? 'या' 7 ट्रिक्स कंटाळा दूर करतील

Sameer Amunekar

लहान लहान टार्गेट ठरवा

मोठं पुस्तक एकाच वेळी वाचण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी रोज ५-१० पानांचं टार्गेट ठरवा. छोटं उद्दिष्ट गाठल्यावर समाधान मिळतं आणि कंटाळा राहत नाही.

Book Reading Tips | Dainik Gomantak

स्वतःशी संवाद साधत वाचा

जे वाचत आहात, त्यावर स्वतःलाच प्रश्न विचारा. "हे का घडलं?", "पुढे काय होईल?" अशा विचारांमुळे वाचनात गुंतवणूक वाढते.

Book Reading Tips | Dainik Gomantak

कल्पना वापरा

वाचताना पात्रांची भाव-भाषा, परिस्थिती डोळ्यासमोर आणा. कल्पना वापरली की मजा येते आणि कंटाळा दूर राहतो.

Book Reading Tips | Dainik Gomantak

योग्य वातावरण

शांत आणि आरामदायक जागा निवडा. फोन, टीव्ही, किंवा इतर व्यत्यय टाळा. एकाग्रता वाढली की वाचनात अधिक रस येतो.

Book Reading Tips | Dainik Gomantak

वाचनशैली बदला

एखादं वेळेस जोरात वाचा, कधी मनात. कधी हायलाईट करा, कधी नोट्स घ्या. बदल केल्याने वाचन रूटीन फ्रेश वाटतो.

Book Reading Tips | Dainik Gomantak

आवडते विषय निवडा

सुरुवात आवडत्या लेखक, कथे, किंवा विषयाने करा. जे आवडतं त्यात मन लागण्याची शक्यता जास्त असते.

Book Reading Tips | Dainik Gomantak

ब्रेक घ्या आणि रिफ्रेश व्हा

एकाच वेळी खूप वेळ वाचण्यापेक्षा मध्ये छोटा ब्रेक घ्या. थोडं फिरा, पाणी प्या आणि नंतर पुन्हा वाचन सुरु करा.

Book Reading Tips | Dainik Gomantak

झोपताना मुली करतात 'या' चुका

Sleep Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा